जा मुली शकुंतले सासरी
जा मुली शकुंतले सासरी
आवरी डोळ्यांमधल्या सरी
वडील मंडळी असतील कोणी
वागच त्यांच्या अर्ध्या वचनी
सवतीलागी मानुनी बहिणी राही सदा हासरी
पतीसेवा हे ब्रीद आपुले
देवाहुन ती थोर पाऊले
रागावून ते जरी बोलले, बोलू नको त्यावरी
दोन्ही कुळांचे नाव वाढवी
पतिव्रतेची पदवी मिळवी
संसारी तुज वाण नसावी, लक्ष्मी तू साजरी !
आवरी डोळ्यांमधल्या सरी
वडील मंडळी असतील कोणी
वागच त्यांच्या अर्ध्या वचनी
सवतीलागी मानुनी बहिणी राही सदा हासरी
पतीसेवा हे ब्रीद आपुले
देवाहुन ती थोर पाऊले
रागावून ते जरी बोलले, बोलू नको त्यावरी
दोन्ही कुळांचे नाव वाढवी
पतिव्रतेची पदवी मिळवी
संसारी तुज वाण नसावी, लक्ष्मी तू साजरी !
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | पु. ल. देशपांडे |
स्वर | - | माणिक वर्मा |
चित्रपट | - | देव पावला |
गीत प्रकार | - | चित्रगीत, नयनांच्या कोंदणी |
ब्रीद | - | प्रतिज्ञा. |
वाण | - | उणीव. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.