A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
इथे मिळाली सागर-सरिता

इथे मिळाली सागर-सरिता, ही प्रीतीची एकरूपता
इथे मिळाली !

कमलफुलांचे सुगंध सिंचन की भ्रमराला गोड निमंत्रण
मिटे पाकळी मीलन घडता, ही प्रीतीची एकरूपता
इथे मिळाली !

या धरणीची हाक ऐकिली, निळे गगन हे झुकले खाली
क्षितिजावरही प्रेम सांगता, ही प्रीतीची एकरूपता
इथे मिळाली !

बांधु अपुले घरकुल चिमणे, तुझियासाठी माझे जगणे
मरणा येईल चिरंजीविता, ही प्रीतीची एकरूपता
इथे मिळाली !
सांगता - पूर्णता.
सिंचन - शिंपणे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  कृष्णा कल्ले, महेंद्र कपूर