हृदयी प्रीत जागते
राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा
हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता
पाहिले तुला न मी तरीही नित्य पाहते
लाजुनी मनोमनी उगीच धुंद राहते
ठाउका न मजसि जरी निषद देश कोणता
दिवसरात्र ओढणी या मनास लागते
तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते
मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता
निमंत्रणाविना पुन्हा हंस येई तो वनी
नादचित्र रेखितो तुझेच मंद कूजनी
वेड वाढवून तो उडून जाय मागुता
हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता
पाहिले तुला न मी तरीही नित्य पाहते
लाजुनी मनोमनी उगीच धुंद राहते
ठाउका न मजसि जरी निषद देश कोणता
दिवसरात्र ओढणी या मनास लागते
तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते
मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता
निमंत्रणाविना पुन्हा हंस येई तो वनी
नादचित्र रेखितो तुझेच मंद कूजनी
वेड वाढवून तो उडून जाय मागुता
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | सुवासिनी |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
कूजन | - | आवाज. |
निषद | - | नल राजाचा देश. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.