हिशोब सांगते ऐका
हिशोब सांगते ऐका भाओजी, कसा खरचला पैका !
ह्यांनी रुपयं दिलेते पंधरा नि ह्यांच्या अंगात नव्हता सदरा
तिथे एक रुपया खरचला

रुपये राहिले चौदा नि ह्यांच्या घरात नव्हता सौदा

आता रुपये राहिले तेरा अन् ह्यांच्या न्हाणीत फुटका डेरा

अहो, रुपये राहिले बारा अन् ह्यांच्या बहिणीला नव्हता थारा

अहो, रुपये राहिले अकरा नि ह्यांच्या मेहुणीचा भारीच नखरा

आता दहाची राहिली नोट नि ह्यांच्या घरात नव्हतं ताट

आता रुपये राहिले नऊ नि मागल्या दाराने आली जाऊ

आता रुपये राहिले आठ अन् पडली माझ्या दिराची गाठ

आता रुपये राहिले सात न् ह्यांच्या घरात नव्हतं जातं

आता रुपये राहिले सहा नि पोलिस पाटलाला पाजला चहा

अहो रुपये राहिले पाच नि ह्यांच्या आरशाला नव्हती काच

आता रुपये राहिले चार अन् फुढल्या सोप्याचं मोडलंय दार

अहो रुपये राहिले तीन नि ह्यांच्या आईचं आला फोन

अहो रुपये राहिले दोन नि ह्यांच्या तोंडाला आली घाण

आता रुपया राहिला एक नि म्या हा दत्तक घेतलाय लेक
तिथे योक रुपया खरचला
हिशोब सांगते ऐका भाओजी, असा खरचला पैका !

गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | कृष्णा कल्ले, बालकराम |
चित्रपट | - | केला इशारा जाता जाता |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
सोपा | - | ओवरी, ओटा. |
सौदा (सवदा) | - | व्यापाराचा माल. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.