A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हिंदी-संघ-राज्याच्या विजयी

हिंदी-संघ-राज्याच्या विजयी-आत्म्या घेई प्रणाम
पराधीन जगताच्या दुर्दम दोस्ता घेई प्रणाम

महाराष्ट्र, गुजराथ, आंध्र, कर्नाटक, तामिळनाड
तसेंच केरळ, आसाम, उरिया, राजस्थान, बिहार
उगवतीचा पंजाब, मावळतीचा वंग
लुकलुकती रत्‍ने, उधळित नित-नव रंग
स्वतंत्र झाली अधिकच खुलली, दुनिया दिपली
पाहुनि तव बलिदान्
नेत्या घेई प्रणाम

कळिकाळाची मगरमिठी तूं छिन्‍नभिन्‍न केली
दीड शतक जो मूर्च्छित मानव जाग त्यास आली
मंत्र दिशा दाही, संपूर्ण लोकशाही
हिंदी ऐक्य स्थापूं हीच पुनः ग्वाही
धनिकशाहीला, गुलामगिरीला, जातीयतेला
ना थारा ना आराम
नेत्या घेई प्रणाम

कोण जिंकुं शकणार आम्हाला ॲटम, हैड्रोजन बॉम्ब?
मैदानीं येउं द्या घालु आम्हिं लोकजुटीचा बांध
तोफा-रणगाडे इथेहि लढतील
मानवशत्रूचे मुडदे पडतील
शस्‍त्रें घेऊं अस्‍त्रें घेऊं, जिंकुनि दावूं
मानव नाहिं गुलाम
नेत्या घेई प्रणाम