ही अनोखी गाठ कोणी
ही अनोखी गाठ कोणी बांधली
एक झाले ऊन आणि सावली
जाणिवांचा पूल कोणी सांधला
ऐलतिरी पैल हाती लागला
रंगली मेंदी नव्याने रंगली
एक झाले ऊन आणि सावली
नाते जरी आहे नवे का ओळखीचे वाटले
हे श्वास दोघांचे कधी स्पर्शाविनाही गुंतले
ही वाट कुठली जागली, दोघांतुनी जी चालली
माझे बहर सारे तुझे, माझे प्रहर सारे तुझे
सार्या क्षणांवर नाव गेले कोरले माझेतुझे
हे बंध जुळले त्या क्षणी, जणू लाभली संजीवनी
एक झाले ऊन आणि सावली
जाणिवांचा पूल कोणी सांधला
ऐलतिरी पैल हाती लागला
रंगली मेंदी नव्याने रंगली
एक झाले ऊन आणि सावली
नाते जरी आहे नवे का ओळखीचे वाटले
हे श्वास दोघांचे कधी स्पर्शाविनाही गुंतले
ही वाट कुठली जागली, दोघांतुनी जी चालली
माझे बहर सारे तुझे, माझे प्रहर सारे तुझे
सार्या क्षणांवर नाव गेले कोरले माझेतुझे
हे बंध जुळले त्या क्षणी, जणू लाभली संजीवनी
गीत | - | वैभव जोशी |
संगीत | - | हितेश मोडक |
स्वर | - | विजय प्रकाश |
चित्रपट | - | पांघरूण |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.