मनावर एक अनामिक भूल
मनावर एक अनामिक भूल
हे माझे पहिले पहिले पाऊल
नव्या जगाच्या उंबरठ्यावर
थोडी आतुर थोडी कातर
सूर लागता विरेल सारे उदास आणि मलूल
चैतन्याने, विश्वासाने
गाईन मी जगण्याचे गाणे
बघता बघता उमलून येईल मधुर यशाचे फूल
सात स्वरांच्या हिंदोळ्यावर
झोके नेईन उंच दूरवर
वर्तमान उलगडे दरवळे, भविष्य दे चाहूल
हे माझे पहिले पहिले पाऊल
नव्या जगाच्या उंबरठ्यावर
थोडी आतुर थोडी कातर
सूर लागता विरेल सारे उदास आणि मलूल
चैतन्याने, विश्वासाने
गाईन मी जगण्याचे गाणे
बघता बघता उमलून येईल मधुर यशाचे फूल
सात स्वरांच्या हिंदोळ्यावर
झोके नेईन उंच दूरवर
वर्तमान उलगडे दरवळे, भविष्य दे चाहूल
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | साधना सरगम |
चित्रपट | - | सखी |
गीत प्रकार | - | मना तुझे मनोगत, चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.