A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हेचि दान देगा देवा

हेंचि दान देगा देवा ।
तुझा विसर न व्हावा ॥१॥

गुण गाईन आवडी ।
हेचि माझी सर्व जोडी ॥२॥

नलगे मुक्ति आणि संपदा ।
संतसंग देई सदा ॥३॥

तुका ह्मणे गर्भवासी ।
सुखें घालावें आह्मांसी ॥४॥
गीत - संत तुकाराम
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर- स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.
गीत प्रकार - संतवाणी
जोडी - प्राप्‍ती.
भावार्थ-

  • हे देवा, मला हेच दान तू दे. तुझा विसर मला कधीही होऊ देऊ नको.
  • तुझ्या गुणांची गाणी मी मोठ्या प्रेमाने गाईन. हीच माझी सगळी प्राप्ती आहे.
  • आणखी मला मुक्ती नको. मला नेहमी साधुसंतांची संगत दे.
  • तुकाराम महाराज म्हणतात, अशी संतसंगत लाभल्यावर मला खुशाल परत जन्‍माला घाल, अगदी सुखाने गर्भवास दे.

गो. वि. नामजोशी
संत तुकारामाची सार्थ अभंगवाणी
सौजन्य- सुलभ प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.