A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हे राष्ट्ररूपिणी गंगे

हे राष्ट्ररूपिणी गंगे ! घेईं नमस्कार माझा.

स्वैरपणें पोहावें वाटे तुझिया प्रेमजलीं,
आकुंचितपण बघुनी तुझें हें जीव होइ वर-खालीं.

स्वतंत्रतेची मूर्ति त्रिभुवनिं म्हणुनि तुझी कीर्ति,
परवशतेच्या कांच-कपाटीं काय असावी वसती?

स्वातंत्र्याचें दान कुणा कधिं मागुनि कुणि दिधलें?
याचक वृत्ती सोड सोड ही- कुणीं तुला हें कथिलें?

ध्यानिं आण सामर्थ्य आपुलें स्वयंप्रकाशिनि गंगे !
स्वतंत्रता मिळविण्या समर्था तुझी तूंच अभंगे.