हे रान चेहर्यांचे
हे रान चेहर्यांचे माझ्या सभोवती
नाही इथे जिवाचा कोणीच सोबती
ही माणसे म्हणू की ही क्रूर श्वापदे?
भेसूर सावल्या की तिमिरात हालती
घेऊन गूढ पोटी विक्राळशा गुहा
प्रत्येक चेहर्याच्या आडून पाहती
दावीत स्वप्नसुंदर ओल्या मरीचिका
येथील पायवाटा दूरात धावती
विश्रब्ध भावनेने टेकिन या शिरा
जागा अशी निरामय नाही कुठेच ती
कल्लोळ गर्जनांचा वाढे क्षणोक्षणी
मी सूर अंतरीचा येथे जपू किती
हे रान चेहर्यांचे घेरीत ये असे
माझ्याही चेहर्याची मजला न शाश्वती
नाही इथे जिवाचा कोणीच सोबती
ही माणसे म्हणू की ही क्रूर श्वापदे?
भेसूर सावल्या की तिमिरात हालती
घेऊन गूढ पोटी विक्राळशा गुहा
प्रत्येक चेहर्याच्या आडून पाहती
दावीत स्वप्नसुंदर ओल्या मरीचिका
येथील पायवाटा दूरात धावती
विश्रब्ध भावनेने टेकिन या शिरा
जागा अशी निरामय नाही कुठेच ती
कल्लोळ गर्जनांचा वाढे क्षणोक्षणी
मी सूर अंतरीचा येथे जपू किती
हे रान चेहर्यांचे घेरीत ये असे
माझ्याही चेहर्याची मजला न शाश्वती
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल. |
मरीचिका | - | मृगजळ. |
विश्रब्ध | - | निरामय. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.