हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा
या दुनियेमध्ये थांबायाला वेळ कोणाला?
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला !
अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी
डाव तुझा येताच जमविशी जपून अपुली खेळी
काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी
भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी
मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव
या सार्यांना चकवशील तर मिळेल तुजला धाव
चतुर आणखी सावध जो जो, तोच इथे रंगला
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला !
(हिरवळीवर खेळताना सभोवार पहावे तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले
उंच झाडे, खुजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे
यशाच्या झुंबराखाली डोलणारी, नाचणारी
अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात
जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते
शेंड्यावरती, फांद्यांवरती नाचवणारे, क्षणात आपुल्या पारावरही थोडी जागा देत नाहीत)
असा येथल्या दरबारातील न्याय सदा आंधळा
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला !
तू ऐकत असता जयघोषाचे नारे
या कालगतीचे नकोच विसरू वारे
फटकार अचूक तू चेंडू या काळाचा
आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा
निरंतर राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला

गीत | - | शांताराम नांदगांवकर |
संगीत | - | गौतम गिरीश |
स्वर | - | सुनील गावस्कर |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.