हे भास्करा क्षितिजावरी
हे भास्करा, क्षितिजावरी या
उजळावयाला दाही दिशा ह्या
पथ लाभु दे रे जीवीतास अवघ्या
मांगल्य बरसो तेजातुनी ह्या
वात्सल्य झुरते हृदयातले रे
किरणातला तो आधार द्याया
कर सोबतीला द्यावा प्रभु हा
आसू पुसावे, जग हे हसावे
सामर्थ्य द्यावे आत्म्यास माझ्या
काट्यातल्या रे कलिकेस ह्या
राहो न कोणी जगी दीन-दु:खी
भरू दे सुधा घासांतुनी ह्या
चैतन्य लाभो श्वासांतुनी ह्या
उजळावयाला दाही दिशा ह्या
पथ लाभु दे रे जीवीतास अवघ्या
मांगल्य बरसो तेजातुनी ह्या
वात्सल्य झुरते हृदयातले रे
किरणातला तो आधार द्याया
कर सोबतीला द्यावा प्रभु हा
आसू पुसावे, जग हे हसावे
सामर्थ्य द्यावे आत्म्यास माझ्या
काट्यातल्या रे कलिकेस ह्या
राहो न कोणी जगी दीन-दु:खी
भरू दे सुधा घासांतुनी ह्या
चैतन्य लाभो श्वासांतुनी ह्या
गीत | - | प्रवीण दवणे |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वराविष्कार | - | ∙ देवकी पंडित ∙ सुरेश वाडकर ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
चित्रपट | - | मी सिंधुताई सपकाळ |
गीत प्रकार | - | चित्रगीत, प्रार्थना |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.