नका विचारू देव कसा
नका विचारू देव कसा
देव असे हो भाव तसा
सगूण कुणी म्हणती देवाला
कोणी म्हणती निर्गुण त्याला
विश्वरूप त्या परमेशाचा चराचराचर असे ठसा
रंग फुलांचा दिसे लोचना
मूर्ति प्रभुची तोषवि नयना
दिसे कधी का कुणास सांगा गंध फुलाचा मोहकसा
दर्पणास का रूप स्वत:चे
असती का आकार जलाचे
साक्षात्कार जसा तो दाखवि दिसेल त्याला प्रभु तसा
देव असे हो भाव तसा
सगूण कुणी म्हणती देवाला
कोणी म्हणती निर्गुण त्याला
विश्वरूप त्या परमेशाचा चराचराचर असे ठसा
रंग फुलांचा दिसे लोचना
मूर्ति प्रभुची तोषवि नयना
दिसे कधी का कुणास सांगा गंध फुलाचा मोहकसा
दर्पणास का रूप स्वत:चे
असती का आकार जलाचे
साक्षात्कार जसा तो दाखवि दिसेल त्याला प्रभु तसा
गीत | - | रा. ना. पवार |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | माणिक वर्मा |
गीत प्रकार | - | भक्तीगीत |
तोष | - | आनंद. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.