A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हे भारतमाते मधुरे

हे भारतमाते मधुरे !
गाइन संतत तव गान

त्याग, तपस्या, यज्ञभूमि तव जिकडेतिकडे जाण
कर्मवीर किति धर्मवीर किति झाले तद्‌गणना न

देउन देउन दीन जाहलिस तरिही देशी दान
परजीवन सांभाळिशि संतत अर्पुन अपुली मान

सत्त्वाचा सत्याचा जगती तूच राखिशी मान
तुझ्या कथा ऐकाया उत्सुक भगवंताचे कान

मांगल्याची माधुर्याची पावित्र्याची खाण
परमेशाच्या कृपाप्रसादे नुरेल तुजला वाण

बहुभाग्याने बहुपुण्याने झालो तव संतान
तव सेवा मम हातुन होता हरपो माझा प्राण