हे आदिमा हे अंतिमा
हे आदिमा, हे अंतिमा
जे वांच्छिले ते तू दिले
कल्पद्रुमा
या मातीचे आकाश तू
शिशिरास या मधुमास तू
देशी मृता तू अमृता
पुरुषोत्तमा
देणे तुझे इतुके शिरी
झालो ऋणी जन्मांतरी
अपकार मी, अपराध मी
परि तू क्षमा
जे वांच्छिले ते तू दिले
कल्पद्रुमा
या मातीचे आकाश तू
शिशिरास या मधुमास तू
देशी मृता तू अमृता
पुरुषोत्तमा
देणे तुझे इतुके शिरी
झालो ऋणी जन्मांतरी
अपकार मी, अपराध मी
परि तू क्षमा
गीत | - | वसंत निनावे |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | रामदास कामत |
गीत प्रकार | - | प्रार्थना |
आदिम | - | आरंभीचा / सुरुवातीचा. |
कल्पदृम | - | कल्पवृक्ष, इंद्रलोकांतील काल्पनिक वृक्ष. इच्छित वस्तू देतो अशी समजूत आहे. |
वांच्छा | - | इच्छा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.