A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हर्षाचा वर्षाचा दिवाळी

हर्षाचा वर्षाचा
दिवाळी सण आला

कारंजी उडती तेजाळ
नाचती बाळ-गोपाळ
आनंद-दीप गोविंद
उधळतो चांदणी झेला

लक्ष्मी देवता खरी
पुजितो दास श्रीहरी
भक्तीचा जीव प्रीतीचा
अंबरी दीप लखलखला

प्रतिपदा मूर्त मंगला
ओवाळी पतिदेवाला
हसता प्रेम अर्पिता
उतरला स्वर्ग भूमीतला