चकाके कोर चंद्राची
चकाके कोर चंद्राची, मनाला मोहिनी घाली
लकाके चंचला बाला, उषा की हासरी आली
कुणा हा भाग्यवंताचा असावा प्रीतिचा ठेवा
कुठे मी काजवा वेडा, कुठे ही तारका बाळी
उदेला चंद्र हा पाही, जिवाला हासवी मोही
करी जादूगिरी कान्हा, भुलवितो हा कसा बाई
कुणा हा भाग्यवंतीचा असावा प्रीतीचा ठेवा
कुठे हा लाल मोलाचा, करंटी गोरटी ही
मिळवणी दोन जिवांची वसे तेथेच वेल्हाळी
बघे ना भेदभावाला जगी प्रीति खुळी भोळी
लकाके चंचला बाला, उषा की हासरी आली
कुणा हा भाग्यवंताचा असावा प्रीतिचा ठेवा
कुठे मी काजवा वेडा, कुठे ही तारका बाळी
उदेला चंद्र हा पाही, जिवाला हासवी मोही
करी जादूगिरी कान्हा, भुलवितो हा कसा बाई
कुणा हा भाग्यवंतीचा असावा प्रीतीचा ठेवा
कुठे हा लाल मोलाचा, करंटी गोरटी ही
मिळवणी दोन जिवांची वसे तेथेच वेल्हाळी
बघे ना भेदभावाला जगी प्रीति खुळी भोळी
गीत | - | स. अ. शुक्ल |
संगीत | - | जी. एन्. जोशी |
स्वर | - | गंगुबाई हनगल, जी. एन्. जोशी |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, युगुलगीत, भावगीत |
उषा | - | पहाट. |
करंटा | - | अभागी. |
वेल्हाळ | - | परम प्रीतिपात्र. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.