हरि वाजवि मंजुळ मुरली
हरि वाजवि मंजुळ मुरली
बाई ! मुरलीने तहान-भूक हरली
कामकाज हातचे टाकुनी
गोकुळ अवघे नाचत हरखुनि
मुरलीच कानि मनि भरली
तान्हुल्यासि पाजिते कुणि गवळण
मुरलीने बावरली ती पण
तिला मुलाचि शुद्धच नुरली
राधा तर बघ वेडी झाली
सोडुनि पतिची शेज चालली
जना-मनाची लज्जा सरली
बाई ! मुरलीने तहान-भूक हरली
कामकाज हातचे टाकुनी
गोकुळ अवघे नाचत हरखुनि
मुरलीच कानि मनि भरली
तान्हुल्यासि पाजिते कुणि गवळण
मुरलीने बावरली ती पण
तिला मुलाचि शुद्धच नुरली
राधा तर बघ वेडी झाली
सोडुनि पतिची शेज चालली
जना-मनाची लज्जा सरली
गीत | - | स. अ. शुक्ल |
संगीत | - | मास्टर कृष्णराव |
स्वर | - | अमिरबाई कर्नाटकी |
गीत प्रकार | - | भावगीत, हे श्यामसुंदर |
शेज | - | अंथरूण. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.