काळ्या गढीच्या जुन्या
काळ्या गढीच्या जुन्या ओसाड भिंतीकडे
आलीस तूं एकटी बांधून सारे चुडे.
काळ्या गढीच्या जुन्या ओसाड भिंतीकडे
आलीस तूं चोरटी बांधुन सारे चुडे.
वारा किती मंद गऽ !
होतें किती कुंद गऽ !
होता किती धुंद गऽ अंधार मागेंपुढें !
काळी निनांवी भीती
होती उभी भोवतीं
वाटेंत होते किती काटेकुटे अन् खडे !
माझी तुझी चोरटी
जेव्हां मिळाली मिठी
हुंकारलें खालतीं आडातलें पारवे.
हुंकारला पारवा;
तेजाळला काजवा;
हालून गेला जरा काळोख चोहींकडे !
आलीस तूं एकटी बांधून सारे चुडे.
काळ्या गढीच्या जुन्या ओसाड भिंतीकडे
आलीस तूं चोरटी बांधुन सारे चुडे.
वारा किती मंद गऽ !
होतें किती कुंद गऽ !
होता किती धुंद गऽ अंधार मागेंपुढें !
काळी निनांवी भीती
होती उभी भोवतीं
वाटेंत होते किती काटेकुटे अन् खडे !
माझी तुझी चोरटी
जेव्हां मिळाली मिठी
हुंकारलें खालतीं आडातलें पारवे.
हुंकारला पारवा;
तेजाळला काजवा;
हालून गेला जरा काळोख चोहींकडे !
गीत | - | ना. घ. देशपांडे |
संगीत | - | जी. एन्. जोशी |
स्वर | - | जी. एन्. जोशी |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • काव्य रचना- १९३५. |
पारवा | - | कबुतराची एक जात किंवा त्याच्या रंगाचा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.