हरी तुझी कळली चतुराई
हरी तुझी कळली चतुराई
हरी रे, भुलायची मी नाही
गायीमागं गोप दवडुनी
लाखांमधली एक निवडुनी
आडरानी या मला अडवुनी, दाविसी धिटाई
गरीब भोळ्या जरी गवळणी
खोडी काढता होऊ नागिणी
बळेच घेसी निंदा ओढुनी, काय रे तर्हा ही
मी न एकटी इथे मोहना
जिवंत पुढती वाहे यमुना
धावुन येईल माझ्या वचना, हिरवी वनराई
हरी रे, भुलायची मी नाही
गायीमागं गोप दवडुनी
लाखांमधली एक निवडुनी
आडरानी या मला अडवुनी, दाविसी धिटाई
गरीब भोळ्या जरी गवळणी
खोडी काढता होऊ नागिणी
बळेच घेसी निंदा ओढुनी, काय रे तर्हा ही
मी न एकटी इथे मोहना
जिवंत पुढती वाहे यमुना
धावुन येईल माझ्या वचना, हिरवी वनराई
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | जशास तसें |
गीत प्रकार | - | चित्रगीत, हे श्यामसुंदर |
गोप | - | गुराखी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.