हले झुलत डुले पाळणा
हले, झुलत डुले पाळणा
प्राणफुला झोपी जा ना
जो जो रे
निजला गंध वारा, झोपला नभी तारा
पेंगुळला पानांवरी कळ्या-फुलांचा तुरा
पुनवा रात बोले, मीट तू बाळा डोळे
झोका देते रे, नीज लाडक्या चिमण्या छकुल्या राजिवा
पाळणा मंद होतो, आईला आलिंगतो
काळजाचे पांघरूण घालिते आई तुला
प्राणफुला झोपी जा ना
जो जो रे
निजला गंध वारा, झोपला नभी तारा
पेंगुळला पानांवरी कळ्या-फुलांचा तुरा
पुनवा रात बोले, मीट तू बाळा डोळे
झोका देते रे, नीज लाडक्या चिमण्या छकुल्या राजिवा
पाळणा मंद होतो, आईला आलिंगतो
काळजाचे पांघरूण घालिते आई तुला
गीत | - | स. अ. शुक्ल |
संगीत | - | स्नेहल भाटकर |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | चिमुकला पाहुणा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.