हलके हलके जोजवा
हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा
पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा
सजली ग मऊमऊ मखमालीची शैय्या
निजली ग बाळाची गोरीगोरी काया
बाळ रूपडे देवाचे भुलविते लोचना
खेळवा लाडानं गोपा बायांनो
'गोविंद घ्या गोपाळ घ्या' म्हणा सयांनो
नाव ठेवा नवसाचं, हा राजा देखणा
कुर्रर्र करा कानात, हळूच भेटा ग
बारशाचा सोहळा घुगर्या वाटा ग
आज बाई इंद्राचा दरबार ठेंगणा
पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा
सजली ग मऊमऊ मखमालीची शैय्या
निजली ग बाळाची गोरीगोरी काया
बाळ रूपडे देवाचे भुलविते लोचना
खेळवा लाडानं गोपा बायांनो
'गोविंद घ्या गोपाळ घ्या' म्हणा सयांनो
नाव ठेवा नवसाचं, हा राजा देखणा
कुर्रर्र करा कानात, हळूच भेटा ग
बारशाचा सोहळा घुगर्या वाटा ग
आज बाई इंद्राचा दरबार ठेंगणा
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | एन्. दत्ता |
स्वर | - | उषा मंगेशकर |
चित्रपट | - | बाळा गाऊ कशी अंगाई |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
घुगरी | - | चण्याची उसळ. (घुगर्या - बाळाच्या बारशाला वाटतात ते उकडलेले काळे चणे.) |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.