A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गृहस्थाच्या अंगणात

गृहस्थाच्या अंगणात हवे तुळशीचे रोप
पाय ठेविता पापाचा तिथे होई थरकाप

तुळशी ग माझे आई तूच आमुची पुण्याई
पूजा तुझी केल्याविण अन्‍न मुखे घालु नाही

तुळशीच्या आसपास कोटी देवतांचा वास
वारंवार नमस्कार, माझा तुळशी मातेस