गोड तुझी बासरी श्रीहरी
गोड तुझी बासरी, श्रीहरी
दिनरजनी रे फुलवित स्वप्ने घुमते मम अंतरी
स्वर मुरलीचे पडता कानी
वसंत फुलतो वनी-उपवनी
गुंगत राही त्रिभुवन अवघे मंजुळ नादावरी
तव मुरलीच्या ऐकून नादा
हसते फुलते भोळी राधा
सदैव माझ्या मनी श्यामला मूर्ति तुझी हासरी
दिनरजनी रे फुलवित स्वप्ने घुमते मम अंतरी
स्वर मुरलीचे पडता कानी
वसंत फुलतो वनी-उपवनी
गुंगत राही त्रिभुवन अवघे मंजुळ नादावरी
तव मुरलीच्या ऐकून नादा
हसते फुलते भोळी राधा
सदैव माझ्या मनी श्यामला मूर्ति तुझी हासरी
गीत | - | सूर्यकान्त खाण्डेकर |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | निर्मला गोगटे |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, कल्पनेचा कुंचला, भावगीत |
उपवन | - | बाग, उद्यान. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.