गा प्रिया जा राया । अमरपद घ्याया समरिं या ॥
नाचत पूर्वा जाया जिवाची । उधळि स्मितरंग करि गुंग ।
रविला प्रिय रणिं न्हाया ॥
गीत | - | य. ना. टिपणीस |
संगीत | - | वझेबुवा |
स्वर | - | शरद जांभेकर |
नाटक | - | शिक्का-कट्यार |
राग | - | बागेश्री |
ताल | - | त्रिवट |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
सन १९१८ फेब्रुवारीं महिन्यांत आर्यावर्त 'नाटक मंडळी'नें 'राज्यारोहण' या नाटकाचे प्रयोग मुंबईचे रंगभूमीवर केले. त्यावेळीं तें नाटक पुस्तकरूपानें प्रसिद्ध झालें नव्हतें. त्यानंतर आज दहा वर्षे तें नाटक तसेंच पडून होतें, परंतु 'ललितकलादर्श मंडळी'चे मालक माझे मित्र श्री. व्यंकटेश बलवंत पेंढारकर यांनी संगीतरूपांत त्याचें पुनर्जीवन करण्याची इच्छा प्रदर्शित केल्यावरून तें आज संगीतरूपाने वाचकांपुढे ठेवीत आहे.
दत्तविधानानंतर मुलाचें व विवाहानंतर मुलीचें नांव बदलण्याची वाहिवाट आहे. त्याप्रमाणेंच गद्यामधून संगीत रंगभूमीवर प्रवेश करतांना जुनें 'राज्यारोहण' नांव रद्द करून त्याला 'शिक्का-कट्यार' असें नवीन नांव दिले आहे. 'फाल्गुनरावा'चें 'संशय-कलोल', 'त्राटिके'चें 'चौदावे रत्न', 'नरकेसरी'चें 'लयाचा लय'.. तसेच हे 'राज्यारोहणा'चे 'शिक्का-कट्यार'.
गुरुवर्य रामकृष्णबुवा वझे या संगीताच्या बादशाहांच्याने नमुनेदार व रसभरित चाली दिल्या, याबद्दल वरील सर्व मंडळींचा मी अत्यंत आभारी आहे.
(संपादित)
यशवंत नारायण टिपणीस
दि. २ जून १९२७.
'शिक्का-कट्यार' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- व्यंकटेश बलवंत पेंढारकर (प्रकाशक)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.