घनश्याम सावळा स्मरता
घनश्याम सावळा स्मरता डोळे भरती
हा राग म्हणू की रुसवा माझ्यावरती?
कुंजात मोहना तू मधुगुंजन केले
लहरीत स्वरांच्या विरघळून मी गेले
का अमृतधारा रूप विषाचे धरती?
विरहात चांदणे हृदय जाळिते माझे
तुजवाचून आता जिणेच झाले ओझे
या भावभावना कणाकणाने झुरती
एकान्त शून्य हा, मीच बंदिनी झाले
हे स्वप्न सुखाचे आसवांत या न्हाले
आभास मनाचे सरले तरीही उरती !
हा राग म्हणू की रुसवा माझ्यावरती?
कुंजात मोहना तू मधुगुंजन केले
लहरीत स्वरांच्या विरघळून मी गेले
का अमृतधारा रूप विषाचे धरती?
विरहात चांदणे हृदय जाळिते माझे
तुजवाचून आता जिणेच झाले ओझे
या भावभावना कणाकणाने झुरती
एकान्त शून्य हा, मीच बंदिनी झाले
हे स्वप्न सुखाचे आसवांत या न्हाले
आभास मनाचे सरले तरीही उरती !
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | प्रभाकर जोग |
स्वर | - | अनुराधा पौडवाल |
चित्रपट | - | कैवारी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, हे श्यामसुंदर |
कुंज | - | वेलींचा मांडव. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.