A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
घट डोईवर घट कमरेवर

घट डोईवर घट कमरेवर
सोडी पदरा नंदलाला

कुणीतरी येईल, अवचित पाहिल
जाता जाता आगही लाविल
सर्व सुखाच्या संसाराला

हलता कलता घट खिंदळता
लज्जेवरती पाणी उडता
नकोच होईन मीच मला

केलीस खोडी, पुरे एवढी
जोवर हसते मनात गोडी
हसुनी तूही हो बाजूला