घर हीच राजधानी
घर हीच राजधानी, नाही उणे कशाचे
संसार साजिरा हा, साम्राज्य हे सुखाचे
राजा उदार माझा, मी तृप्त पट्टराणी
द्याया दुवा उभी ही पाठीस वृद्धवाणी
आयुष्य वर्धती ते उद्गार सार्थकाचे
दिनरात आकळेना, क्षण चांदण्यात न्हाती
वाटे हवेहवेसे ते सर्व येई हाती
औदार्य येथ नांदे त्या विश्वचालकाचे
सार्या फुलुन आशा बहरास बाग आली
नि:श्वास-श्वास सारे स्वरधुंद राग झाले
भर त्यात अमृताची, वच सानुल्या मुखाचे
संसार साजिरा हा, साम्राज्य हे सुखाचे
राजा उदार माझा, मी तृप्त पट्टराणी
द्याया दुवा उभी ही पाठीस वृद्धवाणी
आयुष्य वर्धती ते उद्गार सार्थकाचे
दिनरात आकळेना, क्षण चांदण्यात न्हाती
वाटे हवेहवेसे ते सर्व येई हाती
औदार्य येथ नांदे त्या विश्वचालकाचे
सार्या फुलुन आशा बहरास बाग आली
नि:श्वास-श्वास सारे स्वरधुंद राग झाले
भर त्यात अमृताची, वच सानुल्या मुखाचे
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
चित्रपट | - | बोलकी बाहुली |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
आकळणे | - | आकलन होणे, समजणे. |
पट्टराणी | - | मुख्य राणी अथवा अभिषिक्त राणी. |
सान | - | लहान. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.