A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पाहूं द्या रे मज विठोबाचें

पाहूं द्या रे मज विठोबाचें मुख
लागलीसे भूक डोळां माझ्या ॥

कस्तुरी कुंकुम भरोनिया ताटीं
अंगीं बरवी उटी गोपाळाच्या ॥

जाईजुई पुष्पें गुंफुनियां माळां
घालूं घननीळा आवडीनें ॥

नामा ह्मणे विठो पंढरीचा राणा
डोळिंयां पारण होत असे ॥