A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
घनकंप मयूरा तुला इशारा

घनकंप मयूरा
तुला इशारा
खोल पिसारा
प्राण आडवा पडे
तू वळशिल माझ्याकडे?

घनकंप मयूरा
घनसंथ मयूरा
घननीळ मयूरा
घनदंग मयूरा
घनरंग फकिरा..

घनसंथ मयूरा
धूळ दरारा
कुठे पुकारा
तीक्ष्ण नखांची दीप्ती
गीतांतुन गळते माती

घननीळ मयूरा
रंग फकिरा
तुला पहारा?
कातडे वाळत्या वेळी
ते भीषण ऊन कपाळी.

घनदंग मयूरा
नको सहारा
हलका वारा
बिंदीत चंद्र थरथरते
ती वस्त्र कुठे पालटते..