A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
घडी घडी घडी चरण तुझे

घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा
आसनी शयनी भोजनी गमनी, छंद तुझा अम्हां

दृष्या तीच, पूर्णब्रह्म, नित्य निर्विकारा
अंबुजदल, नयना, मुनि मानस विहारा

सर्वसाक्षी सर्वोत्तम, सर्व गुरुरूपा
प्रेमचित्ता, सौख्यसिंधू, दशरथकुलदीपा

मास दास भ्रात नाथ, तूच एक पाही
केशव ह्मणे, करी कृपा शरण तुझ्या पायी