गेलें द्यायचें राहून
गेलें द्यायचें राहून
तुझें नक्षत्रांचें देणें;
माझ्यापास आतां कळ्या
आणि थोडीं ओलीं पानें.
आलों होतों हांसत मी
कांहीं श्वासांसाठीं फक्त;
दिवसांचें ओझें आतां
रात्र रात्र सोशी रक्त;
आतां मनाचा दगड
घेतों कण्हत उशाला;
होतें कळ्यांचें निर्माल्य
आणि पानांचा पाचोळा.
तुझें नक्षत्रांचें देणें;
माझ्यापास आतां कळ्या
आणि थोडीं ओलीं पानें.
आलों होतों हांसत मी
कांहीं श्वासांसाठीं फक्त;
दिवसांचें ओझें आतां
रात्र रात्र सोशी रक्त;
आतां मनाचा दगड
घेतों कण्हत उशाला;
होतें कळ्यांचें निर्माल्य
आणि पानांचा पाचोळा.
गीत | - | आरती प्रभू |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | आशा भोसले |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • काव्य रचना- ३१ मे १९५९. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.