गारवा वार्यावर भिर भिर
ऊन जरा जास्त आहे, दरवर्षी वाटतं
भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं !
तरी पावलं चालत राहतात, मन चालत नाही
घामाशिवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही !
तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो
उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो !
वारा उनाड मुलासारखा सैरावैरा पळत राहतो
पानाफुला-झाडांवरती, छपरावरती चढून पाहतो !
दुपार टळून संध्याकाळाचा सुरु होतो पुन्हा खेळ
उन्हामागून चालत येते गार गार कातरवेळ !
चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो
पावसा आधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो?
गारवा वार्यावर भिर भिर भिर पारवा नवा नवा
प्रिये नभातही चांदवा नवा नवा
गवतात गाणे झुलते कधीचे
हिरवे किनारे हिरव्या नदीचे
पाण्यावर सर सर सर काजवा नवा नवा
प्रिये मनातही ताजवा नवा नवा
आकाश सारे माळून तारे
आता रूपेरी झालेत वारे
अंगभर थर थर थर नाचवा नवा नवा
प्रिये तुझा जसा गोडवा नवा नवा
भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं !
तरी पावलं चालत राहतात, मन चालत नाही
घामाशिवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही !
तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो
उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो !
वारा उनाड मुलासारखा सैरावैरा पळत राहतो
पानाफुला-झाडांवरती, छपरावरती चढून पाहतो !
दुपार टळून संध्याकाळाचा सुरु होतो पुन्हा खेळ
उन्हामागून चालत येते गार गार कातरवेळ !
चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो
पावसा आधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो?
गारवा वार्यावर भिर भिर भिर पारवा नवा नवा
प्रिये नभातही चांदवा नवा नवा
गवतात गाणे झुलते कधीचे
हिरवे किनारे हिरव्या नदीचे
पाण्यावर सर सर सर काजवा नवा नवा
प्रिये मनातही ताजवा नवा नवा
आकाश सारे माळून तारे
आता रूपेरी झालेत वारे
अंगभर थर थर थर नाचवा नवा नवा
प्रिये तुझा जसा गोडवा नवा नवा
गीत | - | सौमित्र |
संगीत | - | मिलिंद इंगळे |
स्वर | - | मिलिंद इंगळे |
गीत प्रकार | - | ऋतू बरवा, भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.