गणपतीबाप्पा मोरया (१)
गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
मोरया रे बाप्पा मोरया रे
जमला हा जयघोष कराया मेळा बाळा-गोपाळांचा
पार्वतीनंदन गजवदनाचा, मंगल बाप्पा मोरयाचा
एक मुखाने एक सुराने घोष चालतो मोरया
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
मोरया रे बाप्पा मोरया रे
जमले सारे भजनकरी, कुणी घेतला ढोल करी
कुणी होउनी टाळकरी अन् ढोलासंगे ताल धरी
कुणी वाजवी नुसत्या टाळ्या वदे मुखाने मोरया
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
मोरया रे बाप्पा मोरया रे
घोष संपला प्रसाद आणा, मोदक-पेढे वा बेदाणा
गूळ-खोबरे तीर्थ पळीभर किंवा आणा नुसती साखर
प्रसाद खाऊन आनंदाने म्हणतील बाळे मोरया
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
मोरया रे बाप्पा मोरया रे
दो दिवसांनी घरास अपुल्या गणपती बाप्पा निघतील जाया
अखेरचा जयघोष कराया, सागरतीरी निरोप द्याया
जमतील बाळे वदतील तेथे खिन्न मनाने मोरया
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या

गीत | - | |
संगीत | - | मधुकर पाठक |
स्वर | - | कृष्णा शिंदे |
गीत प्रकार | - | प्रथम तुला वंदितो, भक्तीगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.