A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गजानना गजानना

गजानना गजानना करीत तुजसि प्रार्थना
कृपा सदैव ठेव तू मनात हीच कामना

निवारि भक्त-संकटें, अथांग तू अनंत तू
गुणेश तू गणेश तू, सुपूजिताय सुरगणा

प्रभात वेळ मंगला, प्रसन्‍न ही वसुंधरा
अथर्वशीर्ष ऐकता अपार तोष हो मना

कलाविलास-मंडिता, अगाध ज्ञान-पंडिता
स्वरूप-ओंकार तू, जगासी देशी जीवना
तोष - आनंद.
सुर - देव.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.