A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मिटुनी लोचने घे

मिटुनी लोचने घे भिरभिरती
सूर नांदीचे बघ दरवळती
लालचुटुक मखमली आता
अलगद ही उमलेल
भारुनिया अवकाशच अवघा
खेळ नवा रंगेल !

नवीन नांदी नवी संहिता
हवीहवीशी नवी भूमिका
पात्र होउनि विरघळताना
गात्र गात्र बहरेल
भारुनिया अवकाशच अवघा
खेळ नवा रंगेल !

प्रवेश सरला, अंक बदलला
अंधारातच मंच मिळाला
पुन्हा तुझ्यास्तव याच तमांतून
नवा मंच उजळेल !