गाव झाला जागा आता
गाव झाला जागा
आता उठा पांडुरंगा !
उजळली उगवती
जथे पाखरांचे गाती
सकाळच्या कळशीत आली चंद्रभागा
घरोघरी सवाशिणी
सडे शिंपिती अंगणी
साद थकलेले गाती तुक्याच्या अभंगा
रेखितात पोरीबाळी
चार रांगोळीच्या ओळी
विठो-रुक्मिणीचे रूप दावितात रेघा
मराठीच्या मुलुखात
जिथेतिथे पंढरीनाथ
माय धरित्रीही ल्याली सावळ्याच रंगा
आता उठा पांडुरंगा !
उजळली उगवती
जथे पाखरांचे गाती
सकाळच्या कळशीत आली चंद्रभागा
घरोघरी सवाशिणी
सडे शिंपिती अंगणी
साद थकलेले गाती तुक्याच्या अभंगा
रेखितात पोरीबाळी
चार रांगोळीच्या ओळी
विठो-रुक्मिणीचे रूप दावितात रेघा
मराठीच्या मुलुखात
जिथेतिथे पंढरीनाथ
माय धरित्रीही ल्याली सावळ्याच रंगा
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | वसंत पवार |
स्वर | - | माणिक वर्मा |
चित्रपट | - | पंचारती |
गीत प्रकार | - | चित्रगीत, विठ्ठल विठ्ठल |
जथा | - | समुदाय, टोळी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.