जिवलगा
जग सारे इथे थांबले वाटते
भोवताली तरी चांदणे दाटते
मर्मबंधातल्या ह्या सरी बरसता
ऊन वाटेतले सावली भासते
ओघळे थेंब गाली सुखाचा
मिटे अंतर लपेटून घेता
तू माझा मीच तुझी सख्या, जिवलगा
ऐलही तूच अन् पैलही तू सख्या, जिवलगा
मौन नात्यातले बोलते सारखे
शब्द माझेच आता मला पारखे
अंतरंगातले रंग हे शोधण्या
भेटलो एकमेका मनासारखे
रोज दारावरी सांज ओथंबते
भोवताली तरी चांदणे दाटते
मर्मबंधातल्या ह्या सरी बरसता
ऊन वाटेतले सावली भासते
विरघळे बंध हळव्या मनाचा
रीते अंबर मिठीतून झरता
तूच हृदयातही तूच श्वासात या, जिवलगा
आजही ती जुनी हाक येते मला, जिवलगा
भोवताली तरी चांदणे दाटते
मर्मबंधातल्या ह्या सरी बरसता
ऊन वाटेतले सावली भासते
ओघळे थेंब गाली सुखाचा
मिटे अंतर लपेटून घेता
तू माझा मीच तुझी सख्या, जिवलगा
ऐलही तूच अन् पैलही तू सख्या, जिवलगा
मौन नात्यातले बोलते सारखे
शब्द माझेच आता मला पारखे
अंतरंगातले रंग हे शोधण्या
भेटलो एकमेका मनासारखे
रोज दारावरी सांज ओथंबते
भोवताली तरी चांदणे दाटते
मर्मबंधातल्या ह्या सरी बरसता
ऊन वाटेतले सावली भासते
विरघळे बंध हळव्या मनाचा
रीते अंबर मिठीतून झरता
तूच हृदयातही तूच श्वासात या, जिवलगा
आजही ती जुनी हाक येते मला, जिवलगा
गीत | - | श्रीपाद अरुण जोशी |
संगीत | - | निलेश मोहरीर |
स्वर | - | आर्या आंबेकर, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, हृषिकेश रानडे |
गीत प्रकार | - | मालिका गीत |
टीप - • शीर्षक गीत, मालिका- जिवलगा, वाहिनी- स्टार प्रवाह. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.