एकट्याने एकटे गर्दीत चालावे
एकट्याने एकटे गर्दीत चालावे
एकट्याने आपल्याशी फक्त बोलावे
थांबते गर्दी फुलांच्या उंबर्यापाशी
एकट्याने आतुनी निर्माल्य हुंगावे
दार हे अपुले तिर्हाईत होत असे जेव्हा
एकट्याने ओळखावे अन् पुढे जावे
एकट्याला हाक येते रानपक्ष्याची
एकट्याने पाखरू प्राणांत झेलावे
लागते जावेच या अंधारयात्रेला
एकट्याने एकटा अपुला दिवा व्हावे
एकट्याने आपल्याशी फक्त बोलावे
थांबते गर्दी फुलांच्या उंबर्यापाशी
एकट्याने आतुनी निर्माल्य हुंगावे
दार हे अपुले तिर्हाईत होत असे जेव्हा
एकट्याने ओळखावे अन् पुढे जावे
एकट्याला हाक येते रानपक्ष्याची
एकट्याने पाखरू प्राणांत झेलावे
लागते जावेच या अंधारयात्रेला
एकट्याने एकटा अपुला दिवा व्हावे
गीत | - | मंगेश पाडगांवकर |
संगीत | - | श्रीधर फडके |
स्वर | - | अवधूत गुप्ते |
अल्बम | - | संगीत मनमोही रे |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.