A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
एक होता चिमणा

एक होता चिमणा, एक होती चिमणी

नांदुरकीच्या झाडावर त्यांची झाली ओळखदेख
चिमणा म्हणाला चिमणीला, "आपण बांधू घरटं एक"
चिमणी काही बोलेना, जाग्यावरची हालेना
चिमणा म्हणाला, "येशिल ना? माझी मैत्रिण होशील ना?"
चिमणी म्हणाली भीतभीत, "मला किनई पंख नाहीत"

"नसोत पंख नसले तर दोघे मिळून बांधू घर"
चिमणा गेला कामावर, चिमणी बसली झाडावर

चिमणा आला झाडावर, मिळकत घेऊन स्वत:ची
एक कण धान्याचा, एक काडी गवताची
काड्याकाड्या सांधून, घरटं काढलं बांधून
नांदुरकीच्या फांदीवर झुलू लागलं सुंदरसं घर

एके दिवशी अघटित घडले, चिमणीलाही पंख फुटले
चिमणा झाला राजा, चिमणी झाली राणी
एक होता चिमणा, एक होती चिमणी

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  अपर्णा मयेकर, सुमन कल्याणपूर