डोंगरी शेत माझं ग
डोंगरी शेत माझं ग मी बेनू किती?
आलं वरीस राबून मी मरू किती?
कवळाचा भारा बाई ग, घेऊन चढावं किती?
गवताचा भारा बाई ग, घेऊन चढावं किती?
आडाचं पाणी बाई ग, पाणी वडावं किती?
घरात तान्हा बाई ग, तान्हा रडंल किती?
तान्ह्याचं रडं ऐकून पान्हा येईल किती?
आलं आलं वरीस जमीन नांगरून
उभं पीक नाचे सोन्यानं फुलवून
पर एक मेला सावकार कोल्हा
हिसकून घेतो बाई सोन्याचा गोळा
उपाशी राहून ग आम्ही मरावं किती?
म्हागाईनं बाई घातला हैदोस
गळा आवळी बाई बेकारी फास
कुनाचे देऊ आन् कुनाचं ठेवू
अशीच वर्सावर वर्सं जातील किती?
अक्षय र्हाया कुंकू कपाळा
संसारवेलीच्या फुलवाया फुला
रूप नवं आणू महाराष्ट्र भूला
जुलमाचे काच रावणी फास,
एकीचं निशाण हाती !
आलं वरीस राबून मी मरू किती?
कवळाचा भारा बाई ग, घेऊन चढावं किती?
गवताचा भारा बाई ग, घेऊन चढावं किती?
आडाचं पाणी बाई ग, पाणी वडावं किती?
घरात तान्हा बाई ग, तान्हा रडंल किती?
तान्ह्याचं रडं ऐकून पान्हा येईल किती?
आलं आलं वरीस जमीन नांगरून
उभं पीक नाचे सोन्यानं फुलवून
पर एक मेला सावकार कोल्हा
हिसकून घेतो बाई सोन्याचा गोळा
उपाशी राहून ग आम्ही मरावं किती?
म्हागाईनं बाई घातला हैदोस
गळा आवळी बाई बेकारी फास
कुनाचे देऊ आन् कुनाचं ठेवू
अशीच वर्सावर वर्सं जातील किती?
अक्षय र्हाया कुंकू कपाळा
संसारवेलीच्या फुलवाया फुला
रूप नवं आणू महाराष्ट्र भूला
जुलमाचे काच रावणी फास,
एकीचं निशाण हाती !
गीत | - | नारायण सुर्वे |
संगीत | - | |
स्वर | - | शाहीर अमरशेख |
गीत प्रकार | - | लोकगीत |
कवळा | - | छोटी मोळी. एक बाई रानातून लाकूड-फाटा आणते तेव्हा एका वेळी जेवढे कोणाच्याही मदती शिवाय उचलून स्वतःच्या डोक्यावर ठेऊ शकते त्याला कवळा असे म्हंटले जाते. |
बेणणे | - | शेतातले गवत काढण्याचे काम. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.