डोळे तुझे बदामी
डोळे तुझे बदामी, देती मला सलामी
त्यानेच हा असा मी झालो गडे निकामी
लागे न चित्त कामीं, लागे न चित्त धामीं
बोली मिठास त्यांची, कावा तरी गनीमी
छळिती परोपरींनी डोळे तुझे बदामी
सुल्तान मोंगली हे डोळे तुझे बदामी
मोठे लबाड लुच्चे डोळे तुझे बदामी
भुलवून मारणारे डोळे तुझे बदामी
होती क्षणांत भोळे, होती क्षणीं वहीमी
जखमी करून जीवा हसती वरून नामी
मी धुंद मोर कामी, फुलवून रोमरोमीं
हे नाटकी इमानी डोळे तुझे बदामी
त्यानेच हा असा मी झालो गडे निकामी
लागे न चित्त कामीं, लागे न चित्त धामीं
बोली मिठास त्यांची, कावा तरी गनीमी
छळिती परोपरींनी डोळे तुझे बदामी
सुल्तान मोंगली हे डोळे तुझे बदामी
मोठे लबाड लुच्चे डोळे तुझे बदामी
भुलवून मारणारे डोळे तुझे बदामी
होती क्षणांत भोळे, होती क्षणीं वहीमी
जखमी करून जीवा हसती वरून नामी
मी धुंद मोर कामी, फुलवून रोमरोमीं
हे नाटकी इमानी डोळे तुझे बदामी
गीत | - | बा. भ. बोरकर |
संगीत | - | |
स्वर | - | पंडितराव नगरकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
वहीम | - | संशय. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.