दो दिसांच्या संगतीची
का असा गेलास तू? ना बोलता ना सांगता
दो दिसांच्या संगतीची हीच का रे सांगता?
भावमाला लोपल्या ओठीच्या ओठीच का?
फुलविली तू लाज गाली सुकविण्यासाठीच का?
पुसुन गेल्या रंग-रेखा चित्र अपुरे रंगता
दूर व्हाया जवळ आली काय वेडी पाखरे?
ये पुन्हा ये राजहंसा, पंखी जीवा झाक रे
हाक मारू मी कशी रे गुज फुटते बोलता
ठाउका ना ठाव कोठे, मार्ग नाही माहिती
शोध घ्याया अंतरीचे नेत्र माझे धावती
ये उदारा राजसा रे, आसरा दे मागता
दो दिसांच्या संगतीची हीच का रे सांगता?
भावमाला लोपल्या ओठीच्या ओठीच का?
फुलविली तू लाज गाली सुकविण्यासाठीच का?
पुसुन गेल्या रंग-रेखा चित्र अपुरे रंगता
दूर व्हाया जवळ आली काय वेडी पाखरे?
ये पुन्हा ये राजहंसा, पंखी जीवा झाक रे
हाक मारू मी कशी रे गुज फुटते बोलता
ठाउका ना ठाव कोठे, मार्ग नाही माहिती
शोध घ्याया अंतरीचे नेत्र माझे धावती
ये उदारा राजसा रे, आसरा दे मागता
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | ललिता फडके |
चित्रपट | - | मायाबाजार (ऊर्फ वत्सलाहरण) |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
गुज | - | गुप्त गोष्ट, कानगोष्ट. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.