ज्ञानियांचा राजा
ज्ञानियांचा राजा गुरू महाराव ।
ह्मणती ज्ञानदेव तुह्मां ऐसें ॥१॥
मज पामरासीं काय थोरपण ।
पायींची वाहाण पायीं बरी ॥२॥
ब्रह्मादिक जेथें तुह्मां वोळगणे ।
इतर तुळणें काय पुढे ॥३॥
तुका ह्मणे नेणे युक्तीचिया खोलीं ।
ह्मणोनि ठेविली पायीं डोई ॥४॥
ह्मणती ज्ञानदेव तुह्मां ऐसें ॥१॥
मज पामरासीं काय थोरपण ।
पायींची वाहाण पायीं बरी ॥२॥
ब्रह्मादिक जेथें तुह्मां वोळगणे ।
इतर तुळणें काय पुढे ॥३॥
तुका ह्मणे नेणे युक्तीचिया खोलीं ।
ह्मणोनि ठेविली पायीं डोई ॥४॥
गीत | - | संत तुकाराम |
संगीत | - | राम फाटक |
स्वराविष्कार | - | ∙ पं. भीमसेन जोशी ∙ रवींद्र साठे, केशव बडगे ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | संतवाणी |
टीप - • स्वर- पं. भीमसेन जोशी, संगीत- राम फाटक. • स्वर- रवींद्र साठे, केशव बडगे, संगीत- भास्कर चंदावरकर, चित्रपट- आक्रीत (१९८१). |
वोळगणे | - | सेवा करणे / शरण येणे. |
भावार्थ-
- तुम्ही ज्ञानी माणासांचे गुरू महाराज आहात म्हणून तुम्हाला ज्ञानदेव म्हणतात.
- मला गरिबाला मोठेपण कशास देता? पायांतली वहाण पायांतच बरी.
- ब्रह्मादिक देव जेथे तुमच्या ज्ञानापुढे शरण जातात, कौतुक करतात, तेथे इतरांच्या तुलना काय पुर्या पडणार !
- तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानाची किंवा वागणुकीची तशी खोली मला माहिती नाही आणि म्हणूनच मी तुमच्या पायावर डोके ठेवले आहे.
गो. वि. नामजोशी
संत तुकारामाची सार्थ अभंगवाणी
सौजन्य- सुलभ प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.