दिवस असे की कोणी
दिवस असे की कोणी माझा नाही
अन् मी कोणाचा नाही
आकाशाच्या छत्रीखाली भिजतो
आयुष्यावर हसणे थुंकून देतो
या हसण्याचे कारण उमगत नाही;
या हसणे म्हणवत नाही !
प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे
त्यावर नाचे मनीचे अबलख घोडे
या घोड्याला लगाम शोधत आहे;
परि मजला गवसत नाही
मी तुसडा की मी भगवा बैरागी?
मद्यपि वा मी गांजेवाला जोगी?
अस्तित्वाला हजार नावे देतो;
परि नाव ठेववत नाही
'मम' म्हणताना आता हसतो थोडे
मिटून घेतो वस्तुस्थितीचे डोळे
या जगण्याला स्वप्नांचाही आता;
मेघ पालवत नाही
अन् मी कोणाचा नाही
आकाशाच्या छत्रीखाली भिजतो
आयुष्यावर हसणे थुंकून देतो
या हसण्याचे कारण उमगत नाही;
या हसणे म्हणवत नाही !
प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे
त्यावर नाचे मनीचे अबलख घोडे
या घोड्याला लगाम शोधत आहे;
परि मजला गवसत नाही
मी तुसडा की मी भगवा बैरागी?
मद्यपि वा मी गांजेवाला जोगी?
अस्तित्वाला हजार नावे देतो;
परि नाव ठेववत नाही
'मम' म्हणताना आता हसतो थोडे
मिटून घेतो वस्तुस्थितीचे डोळे
या जगण्याला स्वप्नांचाही आता;
मेघ पालवत नाही
गीत | - | संदीप खरे |
संगीत | - | संदीप खरे |
स्वर | - | शैलेश रानडे |
अल्बम | - | दिवस असे की.... |
गीत प्रकार | - | कविता |
अबलख | - | पांढर्या व काळ्या दोन रंगांचा. |
पालविणे | - | खुणावणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.