दिनरात तुला मी किती
दिनरात तुला मी किती स्मरू
जन हसती मला मी काय करू?
भरल्या नयनी हात जोडुनी
सांगु कुणाला काय म्हणोनी?
काहुर मनिचे येता दाटुनि
माझी मला मी कशी सावरू?
कितिकदा मज बघुनी कष्टी
जे येती ते वेडी म्हणती
मुग्ध कळीपरी मिटल्या ओठी
ध्यानिमनी मी अशी किती झुरू?
निराधार मी धुळीस मिळुनी
गेले वेढुनी चहु बाजूंनी
खिन्न जगी या बंदिवान मी
तुला नव्हे तर कुणा विचारू?
जन हसती मला मी काय करू?
भरल्या नयनी हात जोडुनी
सांगु कुणाला काय म्हणोनी?
काहुर मनिचे येता दाटुनि
माझी मला मी कशी सावरू?
कितिकदा मज बघुनी कष्टी
जे येती ते वेडी म्हणती
मुग्ध कळीपरी मिटल्या ओठी
ध्यानिमनी मी अशी किती झुरू?
निराधार मी धुळीस मिळुनी
गेले वेढुनी चहु बाजूंनी
खिन्न जगी या बंदिवान मी
तुला नव्हे तर कुणा विचारू?
गीत | - | रमेश अणावकर |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
गीत प्रकार | - | भावगीत |
काहूर | - | मनातील गोंधळ, बेचैनी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.