दिन तैसी रजनी झाली गे
दिन तैसी रजनी झाली गे माये ॥१॥
पडिलें दूरदेसी, मज आठवे मानसी ।
नकोनको हा वियोग, कष्ट होताती जिवासी ॥२॥
अवस्था लावोनी गेला अजून का न ये ॥३॥
गरुडवाहना गुणगंभीरा, येईगा दातारा ।
बाप रखुमादेवीवरा श्रीविठ्ठला ॥४॥
पडिलें दूरदेसी, मज आठवे मानसी ।
नकोनको हा वियोग, कष्ट होताती जिवासी ॥२॥
अवस्था लावोनी गेला अजून का न ये ॥३॥
गरुडवाहना गुणगंभीरा, येईगा दातारा ।
बाप रखुमादेवीवरा श्रीविठ्ठला ॥४॥
गीत | - | संत ज्ञानेश्वर |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वराविष्कार | - | ∙ आशा भोसले ∙ किशोरी आमोणकर ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | संतवाणी |
टीप - • स्वर- आशा भोसले, संगीत- पं. हृदयनाथ मंगेशकर. • स्वर- किशोरी आमोणकर, संगीत- किशोरी आमोणकर. |
अवस्था | - | उत्कंठा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.