धन्य आजि दिन
धन्य आजि दिन ।
जालें संतांचें दर्शन ॥१॥
जाली पापा-तापा तुटी ।
दैन्य गेलें उठाउठीं ॥२॥
जालें समाधान ।
पायीं विसांवलें मन ॥३॥
तुका ह्मणे आले घरा ।
तोचि दिवाळीदसरा ॥४॥
जालें संतांचें दर्शन ॥१॥
जाली पापा-तापा तुटी ।
दैन्य गेलें उठाउठीं ॥२॥
जालें समाधान ।
पायीं विसांवलें मन ॥३॥
तुका ह्मणे आले घरा ।
तोचि दिवाळीदसरा ॥४॥
गीत | - | संत तुकाराम |
संगीत | - | श्रीनिवास जोशी |
स्वर | - | पं. भीमसेन जोशी |
गीत प्रकार | - | संतवाणी |
तुटी | - | नाश. |
भावार्थ-
- आजचा दिवस धन्यतेचा आहे कारण आज मला संतांचे दर्शन झाले.
- त्यामुळे माझे सगळे पाप नाहीसे झाले, त्रास संपला, दैन्य गेले.
- यांच्या दर्शनाने माझ्या मनाला अतिशय समाधान झाले आहे. या संतांच्या पायाशी माझे मन गुंतले आहे, पूर्णपणे विसावले आहे
- तुकाराम महाराज म्हणतात, हे साधुसंत माझ्या घरी आले त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. दिवाळी-दसर्याच्या सणाच्या दिवशी जसा आनंद होतो, तसा आनंद झाला आहे.
गो. वि. नामजोशी
संत तुकारामाची सार्थ अभंगवाणी
सौजन्य- सुलभ प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.