तेणें मुक्ति चारी साधिलिया ॥१॥
हरि मुखें ह्मणा हरि मुखें ह्मणा ।
पुण्याची गणना कोण करीं ॥२॥
असोनि संसारीं जिव्हे वेगु करीं ।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेवो ह्मणे व्यासाचिये खुणे ।
द्वारकेचे राणे पांडवां घरीं ॥४॥
गीत | - | संत ज्ञानेश्वर |
संगीत | - | श्रीधर फडके |
स्वराविष्कार | - | ∙ सुरेश वाडकर ∙ प्रसाद सावकार ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
नाटक | - | गीता गाती ज्ञानेश्वर |
गीत प्रकार | - | संतवाणी, नाट्यसंगीत |
टीप - • स्वर- सुरेश वाडकर, संगीत- श्रीधर फडके. • स्वर- प्रसाद सावकार, संगीत- वसंत देसाई, नाटक- गीता गाती ज्ञानेश्वर. |
जो रोज क्षणभर तरी देवाच्या द्वारात उभा राहतो तो मोक्षाभिमुख झाला. वाणी हे देवाचे द्वार होऊ शकते. मनुष्याला संसारात वागावे लागत असले तरी वाणीत त्याने संसार भरू नये. वाणी हरि-नामस्मरणाकडेच योजावी. नाम-स्मरण करणार्याला भगवान् वश होतो याविषयी व्यासादिकांची साक्ष आहे.
आचार्य विनोबा भावे
ज्ञानेश्वरांची भजनें
सौजन्य- परंधाम प्रकाशन, वर्धा.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
'गीता गाती ज्ञानेश्वर' ही नाट्यकृती श्री संत ज्ञानेश्वर यांच्या जीवन-चरित्रावर आधारलेली आहे. या बाळबोध नाट्यकृतीपासून माझी अपेक्षा एवढीच आहे की, हा नाट्यप्रयोग पाहिलेल्या रसिकांतून एखाद्याला तरी ज्ञानेश्वरीतली एखादी ओवी वाचण्याची इच्छा झाली तरी मी स्वतःला कृतकृत्य समजेन.
आतापावेतो झालेल्या पन्नासावर प्रयोगांना रसिकांनी जी गर्दी केली त्यावरून ही नाट्यकृती यशस्वी झाल्याचे सहज लक्षात येईल. पण हे यश माझे नसून या यशापाठीमागे उभी आहे रसिकांची ज्ञानेश्वरभक्ती आणि ही लाकृती साकार करण्याकरता जिवापाड मेहनत करणार्यांची महान शक्ती. या शक्तीतला सिंहाचा वाटा आहे, पद्मश्री वसंतराव देसाई यांच्या संगीताचा. श्री. विद्याधर गोखले यांच्या गीतरचनेनं आणि वाक्यरचनेनं हे यश अधिकच खुलवलं आहे. प्रयोग यशस्वी करण्याकरता श्री भालचंद्र पेंढारकर यांनी जे कष्ट केले ते फक्त तेच करू जाणे ! या सर्व ज्ञानेश्वरभक्त सहकार्यांच्या आणि ज्ञानेश्वरभक्त रसिकांच्या ऋणात असे अखंड राहू द्यावे, एवढीच ज्ञानेश्वरचरणी प्रार्थना आहे !
(संपादित)
नानासाहेब शिरगोपीकर
'गीता गाती ज्ञानेश्वर' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- ग. पां. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.