देवा मला का दिली बायको
देवा मला का दिली बायको अशी?
शिकवून थकलो मी दर दिवशी !
श्रीमंताची लेक आहे आळशी अती
एवढीशी खोली तरी घाण ही किती
पलंगाच्या खाली सदा खेळती घुशी !
उपवास धरी, करी एकादशी
दिसभर पिते लस्सीवरही लस्सी
आणि फराळाने भरी दोन्हीही कुशी !
बॉबीकटवाली माझी राणी असे
हिच्या वागण्याने केले वेडेपिसे
धाकानं मी ओठावरची काढितो मिशी !
सत्यनारायणा तुझी पूजा घातली
हिच्या पुढे पोथी-पुरणेही वाचली
तरी गुलहौशी आहे जशीच्या तशी !
शिकवून थकलो मी दर दिवशी !
श्रीमंताची लेक आहे आळशी अती
एवढीशी खोली तरी घाण ही किती
पलंगाच्या खाली सदा खेळती घुशी !
उपवास धरी, करी एकादशी
दिसभर पिते लस्सीवरही लस्सी
आणि फराळाने भरी दोन्हीही कुशी !
बॉबीकटवाली माझी राणी असे
हिच्या वागण्याने केले वेडेपिसे
धाकानं मी ओठावरची काढितो मिशी !
सत्यनारायणा तुझी पूजा घातली
हिच्या पुढे पोथी-पुरणेही वाचली
तरी गुलहौशी आहे जशीच्या तशी !
गीत | - | हरेंद्र जाधव |
संगीत | - | मधुकर पाठक |
स्वर | - | प्रह्लाद शिंदे |
गीत प्रकार | - | लोकगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.